“शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई | Sharad Pawar On Dasara Melava – सध्या शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) दसरा मेळावा घेण्यासाठी वाद सुरू आहे. याच संदर्भात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवतीर्थावरच झाला पाहिजे कारण शिवतीर्थ म्हणजे शिवसेना असं समीकरण आहे, असं शरद पवार म्हणाले.
संजय राऊतांना (Sanjay Raut) वाऱ्यावर सोडलं असा आरोप भाजपने (BJP) केला होता त्याला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. कारण राऊतांना अटकही त्यांनीच केली अन् आरोपही तेच करतात. त्याचबरोबर अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) आणि संजय राऊतांना त्यांनीच अटक केली त्यामुळे कुणी वाऱ्यावर सोडलं हे वेगळं सांगायची गरज नाही”, असं शरद पवार म्हणाले. तसंच कोण आरोप करतंय त्याची नोंद आपण घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.
तसंच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधकांची इच्छा आहे की, एकत्रितपणे लढावं पण अजून तसा निर्णय झाला नाही, असंही शरद पवार म्हणाले.