ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवार निवडणुकांसाठी मैदानात! आमदार- खासदारांची मुंबईत तातडीने बैठक; कारण गुलदसत्यात..

मुंबई : (Sharad Pawar On MP Adn MLA) राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता पक्ष बांधणीवर भर दिला आहे. शरद पवार यांनी राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही मोर्चेबांधणी सुरू आहे. ही सर्व तयारी सुरू असतानाच शरद पवार यांनी आमदार आणि खासदारांना तातडीने मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व विद्यमान आमदार आणि खासदारांना बोलावण्यात आलं आहे. याशिवाय माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आालं आहे. स्वत: शरद पवार या बैठकीला संबोधित करणार आहेत. शरद पवार यांनी अचानक तातडीने बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

शरद पवार या बैठकीत आमदार आणि खासदारांच्या कामकाजांचा आणि त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. माजी आमदार आणि माजी खासदारांच्या मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला संबोधित करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये