मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पवारांनी फुंकलं रणशिंग; म्हणाले…

मुंबई – Sharad Pawar on Mumbai Municipal Election येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीसाठी तर स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
शरद पवार यांनी मुंबई महापालिकेसाठी (Sharad Pawar on Mumbai Municipal Election) सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दर 20 दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून तिथल्या परिस्थितीचा अहवाल पवारांना देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचं आश्वासन शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
दरम्यान, मुंबईतील घराघरात पोहोचा तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये सदस्य नोंदणी वाढवण्याचा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.