सोलापूर : (Sharad Pawar On Nana Patole) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येवून भाजप विरुध्द लढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी काँग्रेससोबतच्या मैत्रीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.
दरम्यान, शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांना २०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित निवडणुका लढणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही”.
“नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत त्यासंबंधित मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्याचा अंतिम निर्णय झाला नाही”. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्यानं, काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.