ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“गुजरात अन् 2, 3 छोट्या राज्यात भाजप, मात्र, इतर राज्यात नाही”; शरद पवारांनी सर्वच काढलं

नवी दिल्ली : (Sharad Pawar On Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना भाजप व अजित पवार गटावर जोरदार टीक करत सर्वच काढलं. जनता आता भाजपला दूर करेल, असे शरद पवार म्हणाले. “देशात अनेक ठिकाणी भाजप नाही. केरळ, हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथं भाजप नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश इथं सरकार पाडून भाजपने सरकार बनवलं. पंजाब, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल इथं भाजप नाही. गुजरात आणि 2 ते 3 छोट्या राज्यात भाजप आहे. म्हणून मी म्हणतो देशाचा मूड बदलला आहे. लोक या बदलत सहभागी होत आहे. जनता आता देशाला दूर करेल.”

माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर सर्वांच्या सह्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातील निर्णय आपल्या बाजून लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी केंद्र सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे. लोकांना तपास यंत्रणा माहित नव्हत्या पण आता विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. पूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान यांच्यात खूप फरक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट असल्याचे त्यांनी म्हटले होते. आम्ही त्यांना पुरावे मागितले. चौकशी करण्याची मागणी केली. मात्र त्यांच्याविरोधात आरोप होते. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले, असे शरद पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही आला तरी चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये