ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

शरद पवारांचा कारखानदारांना मोलाचा सल्ला! म्हणाले,” इथेनॉलसह CNG, हायड्रोजन…”

पुणे : (Sharad Pawar On Sugar Factory Businessman) भविष्यात साखर कारखान्यांना (Sugar factory) सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरिक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावं लागणार असल्याचा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे. सध्या देशात साखरेचं (Sugar) मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादित केली जात आहे. त्यामुळे साखरेला किफायतीश दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतो असेही पवार म्हणाले.

दरम्यान शरद पवार पुढे म्हणाले, कारखान्यांनी सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे करावा. ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) इथे बोलत होते. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 46 वी सर्वसाधारण सभा पार पडली. ऊसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर चांगल्या जातीच्या बेण्याचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी साखर कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रमाणेच सीएनजी आणि हायड्रोजन वापराकडे लक्ष द्यायला हवं. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीची वाहनं अधिक मायलेज देतात. त्यामुळे सीएनजी हे प्रभावी इंधन ठरत आहे. म्हणून साखर कारखान्यांनी याचा विचार करायला हवा असे शरद पवार म्हणाले. यंदाचा गळीत हंगाम 191 दश लक्ष टन होईल असा अंदाज असल्याचे पवार म्हणाले. हा जागतिक उच्चांक होणार आहे. मागील वर्षी 185 दशलक्ष टन ऊसाचं गाळप झाल्याचे शरद पवार म्हणाले. मागील वर्षी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन केलं आहे. महाराष्ट्रने साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये