ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

भाजपचं मिशन ४५ जाहीर; अन् शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यात बैठकीचे सत्र सुरु

पुणे : (Sharad Pawar Pune Important Meeting) आगामी लोकसभेसाठी भाजप कामाला लागले असून त्यांच्या मिशन 45 ला ब्रेक लावण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्या पार्श्वभुमीवर पवारांनी आज पुण्यात तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबात कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या आहेत.

दरम्यान, पवारांनी कार्यकर्त्यांना काही कानमंत्र दिले आहेत. त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांनी सांगितलं की, पुण्यातील शिरुर व बारामती या तालुक्यातील आज बैठक पार पडली आहे.

राष्ट्रवादीची पुणे जिल्ह्यात ताकद जास्त आहे त्यामुळे अंतर्गत मतभेद देखील आहेत त्यावर तोडगा काढण्या बाबत चर्चा झाली, तर ते पुढं म्हणाले, शिरूर बारामती मध्ये कोणीही आलं तर येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच निवडून येईल. बाहेरच कोणी ही आला तरी लोक इथं राष्ट्रवादीलाच ताकद देतील असा विश्वास या वेळी त्यांनी बोलून दाखवला.

अजित पवारांची पाठ राखन करताना म्हणाले, राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजितदादा यांच्यावर वर टीका होत आहे, आम्ही स्वराज्य रक्षकच म्हणणार,ज्यांना काय म्हणायच ते म्हणाव, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये