राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हालचाली वाढल्या, निवडणूक आयोगात शरद पवार दाखल
नवी दिल्ली | Election Commission Hearing On NCP – आज राष्ट्रवादी (NCP) पक्ष कोणाचा होणार? यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. त्यामुळे आता हालचाली वाढल्या आहेत. तर या सुनावणीसाठी शरद पवार स्वत: निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. तसंच शरद पवारांसोबत जिंतेद्र आव्हाड आणि इतर नेते देखील हजर झाले आहेत.
तर आता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरूवात झाली आहे. तर या सुनावणीत एकाच गटाला भूमिका मांडण्यासाठी वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 4 ते 6 या वेळेत पार पडणार आहे.
या सुनावणीला शरद पवार हे स्वत: हजर राहिल्याने सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाची होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर शरद पवार यांनी सुनावणीआधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.