शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, अजित पवार गटाचा युक्तीवाद
नवी दिल्ली | NCP News – राष्ट्रवादी (NCP) पक्ष कोणाचा होणार? यावर आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी शरद पवार (Sharad Pawar) स्वत: निवडणूक आयोगात (Election Commission) दाखल झाले आहेत. तर या सुनावणीदरम्यान शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) केला आहे.
30 जून रोजी अजित पवार यांची बहुमतानं अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी पक्षात झालेल्या नियुक्ती पक्ष घटनेला धरून नाहीत. ज्याप्रमाणे संख्याबळ असेल त्यांना पदाधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकारी आहेत, अशी बाजूही अजित पवार गटानं मांडली.
53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही अजित पवार गटानं केला आहे. तर विधान परिषदेत 9 पैकी 6 आमदार आणि नागालँडचे 7 आमदार आमच्या सोबत आहेत, असा दावाही अजित पवार गटानं केला.