ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा तरीही पवार शिबिराला हजर, मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांना म्हणाले…

शिर्डी : (Sharad Pawar Speech NCP Shibir Shirdi) मागच्या 4-5 दिवसापासून मुंबईतल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु असताना, हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा, मुंबई-शिर्डी असा लांबचा पल्ल्याचा प्रवासाचा पुर्ण करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचार मंथन शिबिराला हजरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावेळी पवार यांनी अवघ्या पाच मिनिटांच्या मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

यावेळी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांची भाषणे ऐकून घेतली आहेत. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.

जाहीर सभेत, कार्यक्रमात सुमारे तासभर उभं राहून भाषण करणारे शरद पवार यांना आज आजारपणामुळं बसून भाषण करावं लागलं. त्यांनी अवघी पाच मिनिटे भाषण करताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांचा आवाज क्षीण असल्याचे दिसून आलं. त्यानंतर शरद पवार यांचे लिखित भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवलं. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये