Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

पवारांनी तीनवेळा शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन!

नागपूर- जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘शरद पवार यांनी तीनवेळा शिवसेना फोडली’ या वक्तव्याला जास्त महत्त्व द्यावं असं हे वक्तव्य नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना पवारांनी, केंद्र सरकारने संसदीय अधिवेशनमध्ये काही शब्द बोलण्यास बंदी घातलेल्या निर्णयावरही आपलं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे. उद्या आम्ही बैठकीत यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू, असं पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये