‘बंडखोरांना किंमत तर मोजावीच लागणार’: शरद पवारांचा इशारा

मुंबई Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे आमदार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील चाळीस पेक्षा जास्त आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या दिशेने आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांना महाविकास आघाडी सोबत सरकारमध्ये राहायचं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. अगोदर महाविकास आघाडी मधून बाहेर पडा नंतरच आम्ही समोर येऊ असं स्पष्ट वक्तव्य शिंदे गटाकडून करण्यात आल आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी शिंदे गटाला आवाहन केलं आहे की, तुम्ही मुंबईत येईन समोरासमोर बोला आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केल आहे. यावर शरद पवार ऍक्शन मोड मध्ये आले आहेत.
शरद पवार यांनी शिंदे गटातील आमदारांना इशाराच दिला आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना याची किंमत मोजावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री हे महाविकास आघाडी सरकारसोबत असणे महत्वाचे आहे. ते जोपर्यंत आमच्यासोबत आहेत तोपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठींबा देणार आहोत अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी दिली आहे.