क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

बॉलिंग टाकतो क्विक… म्हणत लॉर्ड शार्दुलने घेतला ढासू उखाणा

Shardul Thakur and Mitali Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हा नुकताच आपली गर्लफ्रेंड मिताली परूळकरशी विवाह बंधनात अडकला. त्याने कर्जत येथील फार्म हाऊसवर आपल्या काही निवडक मित्र आणि कुटुंबीयांसोबत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. शार्दुलच्या हळदीपासून सात फेऱ्यांपर्यंतच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

आता शार्दुल ठाकूरचा मराठीतून घेतलाला फर्मास उखाणा देखील व्हायरल होत आहे. शार्दुल ठाकूरने घिटापिटा उखाणा न घेता मितालीसाठी खास आपल्या शैलीत उखाणा तयार केला. शार्दुल उखाणा घेताना म्हणतो की ‘बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक.. मिताली आमची सुंदरतेचं प्रतिक!’शार्दुलचा हा क्रिकेटिंग उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शार्दुल आणि मिताली एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम निर्माण झालं आणि आज अखेर ते लग्नबंधनात अडकले. 31 वर्षीय शार्दुलचा संगीत आणि हळदी समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी देखील हजेरी लावली होती.

शार्दुल आणि मिताली यांनी २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबईत एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचं ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनोरंजन केंद्र होतं. शार्दुलनं २०१७ मधये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. भारतासाठी त्यानं ८ कसोटी, ३४ वनडे आणि २५ टीट्वेंटी सामने खेळले आहेत. तसेच ९९ विकेटही त्यानं घेतल्या आहेत. तर ६२१ रन्स बनवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये