अर्थइतरताज्या बातम्या

शेअर बाजार आपटला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

मुंबई | Share Market Opening – आज (27 फेब्रुवारी) शेअर बाजार (Stock Market) चांगलाच आपटला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) घसरण झाली आहे. तसंच जागतिक बाजारात चढ-उतार कायम आहे. भारतीय शेअर बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिस्थितीचा परिणाम दिसून येत आहे.

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीनं झाली आहे. सेन्सेक्स 59400 च्या खाली घसरला असून निफ्टीही घसरण व्यवहार करत आहे. आज सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजारात व्यवहार मंदावलेले दिसत आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आजच्या शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक 132.62 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 59,331.31 वर उघडला. तर, एनएसई (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 37.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 17,428.60 वर उघडला आहे.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 12 शेअर्सच्या व्यवहारात तेजी दिसून येत आहे आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तसंच निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 11 शेअर्स तेजीत असून 38 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये