क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात नसून घातपात; सरकारची लेखी कबुली

सिंधुदुर्ग : (Shashikant Varishe’s accident done by purpose) दोन महिन्यापूर्वी राजापूर येथिल पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती झालेल्या मृत्यूवर शंका निर्माण करण्यात आली होती. तर विरोधीपक्षाने हा घातपातच असल्याचे म्हटलं होतं. आता दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. सध्या या प्रकरणाची एसआयची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणल्याची कबुली खुद्द राज्य सरकारनं दिली आहे.

दरम्यान, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्वाला राज्य सरकारनं लेखी उत्तर दिलं आहे. त्या उत्तरात सरकारनं या अपघाताबद्दल लिहिलं आहे. यापुर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली आहे.

शशिकांत वारिशे यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवू आणला, असं राज्य सरकारनं विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असल्याची माहितीही दिली आहे. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे निश्चित झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये