ताज्या बातम्यामनोरंजन

“भाड्याने बाॅयफ्रेंड अणि नवरा…”, शर्लिन चोप्राचे राखी सावंतवर गंभीर आरोप

मुंबई | Sherlyn Chopra – बाॅलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. शर्लिननं साजिद खानवर (Sajid Khan) लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसंच त्याची बिग बाॅसच्या घरातून हकालपट्टी करण्याची मागणीही तिनं केली आहे. तसंच शर्लिननं साजिद विरोधात तक्रार दाखल करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात पत्र लिहलं होतं. तसंच शर्लिन चोप्रानं साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर राखी सावंतनं (Rakhi Sawant) साजिदचं समर्थन करत शर्लिनवर टीका केली होती. यावर आता शर्लिननं राखीवर गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिलं आहे.

“राखी सावंत काय करते? 31 किलोचा मेकअप करून अलिशान हाॅटेलमध्ये जाऊन खासगी कामं करते आणि करूनही घेते. भाड्यानं बाॅयफ्रेंड आणि नवरा आणते. एका वर्षात त्यांना कंगाल करते आणि सोडून देते”, असे गंभीर आरोप शर्लिननं राखीवर केले आहेत.

दरम्यान, शर्लिननं साजिद खानवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचंही सांगितलं. ती म्हणाली, “आम्ही आंदोलन करणार आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांनाही भेटणार आहोत. जोपर्यंत साजिद खानला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

राखी सावंतनं शर्लिन चोप्रावर नेमके काय केले होते आरोप?

“कधी राज कुंद्रावर तर कधी साजिदवर. ही रोज उठून चार किलोचा मेकअप करुन मीडियासमोर येऊन कोणाविरोधात तक्रार करते. सहा महिन्यांनी कोणावर तरी लैंगिक शोषणाचे आरोप करत बलात्काराची केस करताना दिसेल. तू साडी नेसायला आता शिकली आहेस. तू आधी काय कपडे घालायची. आधी स्वत:मध्ये सुधारणा कर. मग दुसऱ्यांना बोल”, असे आरोप राखीने शर्लिनवर केले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये