“त्याने गुप्तांगाला स्पर्श…”, शर्लिन चोप्राचा साजिद खानवर गंभीर आरोप

मुंबई | Sherlyn Chopra – गेल्या काही दिवसांपासून साजिद खान (Sajid Khan) आणि शर्लिन चोप्रा (Sharlyn Chopra) हा वाद चर्चेत आहे. शर्लिन चोप्रानं साजिदवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. तसंच तिनं साजिद खानविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. यादरम्यान शर्लिननं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना साजिद खानला तुरूंगात टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एएनआयशी बोलताना शर्लिन म्हणाली, “मी नुकतीच #MeToo आरोपी साजिद खानच्या विरुद्ध लैंगिक छळ आणि धमकीची तक्रार दाखल केली आहे. जेव्हा मी तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले तेव्हा पोलिसांनी मला सर्वप्रथम ही घटना कधी घडली असं विचारलं. मी त्यांना, हे सर्व 2005 मध्ये घडल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी मला, त्याच्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ का लागला? असा प्रश्न केला. त्यावेळी मी, साजिद खानसारख्या नाव मोठं असलेल्या व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्याचं धाडस माझ्यात नव्हतं, असं उत्तर दिलं.”
पुढे ती म्हणाली, “2018 मध्ये सुरू झालेल्या ‘मीटू’ चळवळीदरम्यान जेव्हा मी महिलांना पुढे येताना आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलताना ऐकलं तेव्हा मला धीर आला. साजिद खान केवळ माझ्याबरोबरच नाही तर अनेक महिलांबरोबर असा वागला आहे. साजिद खाननं त्या महिलांशी कसं गैरवर्तन केलं हे तुम्ही सोशल मीडियावरून जाणून घेऊ शकता.”
“साजिदनं काही महिलांना थेट सेक्सबद्दल विचारलं, जसं की त्या एका दिवसात किती वेळा सेक्स करतात? त्यांचे किती बॉयफ्रेंड आहेत? एवढंच नाही तर साजिदनं मला त्याचं गुप्तांग दाखवून त्याला स्पर्श करण्यास सांगितलं होतं. मग या घटनेला एवढी वर्षे झाल्यानंतर एखादी स्त्री आपल्या वेदना सांगू शकत नाही का? अर्थातच ती करू शकते. त्यावेळी माझ्याकडे तेवढी हिंमत नव्हती पण आज मी हे करू शकते. आज मला वाटतं की साजिद खान असो किंवा राज कुंद्रा, जर त्याने चूक केली असेल तर मी त्याच्या विरोधात आवाज उठवू शकते”, असंही शर्लिन म्हणाली.
One Comment