क्रीडाताज्या बातम्या

शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर केले मोठे भाष्य

मुंबई | भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांना विभक्त होऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत. त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा सुरू झाल्यापासून शिखर धवन किंवा त्याची पत्नी या दोघांनीही याबद्दल उघडपणे काही सांगितले नाही. मात्र, एका मुलाखतीदरम्यान शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर मोठं भाष्य केलं आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला, जेव्हा त्याची पत्नी आयशा मुखर्जीने त्यांच जवळपास नऊ वर्ष जुन नाते संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. लग्न मोडण्यास आपणच जबाबदार असल्याचं शिखरन सांगितल, आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिखरनं अनेक विषयांवर भाष्य केलं.

“मी अपयशी ठरलो कारण कोणीही निर्णय घेतो तेव्हा अंतिम निर्णय त्याचाच असतो. मला इतरांकडे बोट दाखवायला आवडत नाही. मी अयशस्वी झालो कारण मला त्या क्षेत्राची कल्पना नव्हती. जर तुम्ही मला 20 वर्षांपूर्वी विचारले असते, तर मला क्रिकेटबद्दलच्या या सर्व गोष्टी माहित नसत्या, ज्याबद्दल मी आज बोलत आहे. हा सर्व अनुभवाचा विषय आहे. व्यक्तीसोबत एक दोन वर्ष घालवा आणि दोघांचेही संस्कार जुळतात का पाहा,” असं शिखर यावेळी म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये