मुलीसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ ७ महत्वाचे निर्णय
मुंबई : (Shinde Governmen Of Big decision) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत महत्त्वाचे ७ निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुलींच्या जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी याबाबत सांगितलं की, मुलींच्या जन्मदर वाढीसाठी जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात सरकारने वाढ केली आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.
सरकारच्या ‘लेक लाडकी’ या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ हजार, दुसऱ्या टप्प्यात ६ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ८ हजार मुलांना याचा लाभ मिळणार आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये मिळणार. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये मिळणार. सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये मिळणार. अकरावीत ८ हजार रुपये मिळणार. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहेत. अशारितीने मुलींना १ लाख १ हजार रुपये मिळतील.