शिंदे सरकारचं नेमकं चाल काय? आधी स्थगिती; नंतर नामांतरचा निर्णय!

मुंबई : (Shinde Government Cabinet Meeting) महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आसताना काही नामांतराचे निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या अन् ठाकरे सरकार कोसळलं. शिवसेनेशी बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
ठाकरे सरकारनं आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला-संभाजीनगर, उस्मानाबादला-धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला-दी बा पाटील यांचं नामंतराचे विषय कॅबिनेटमध्ये मंजूर करुन घेतले. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली.
या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, नवी मुंबई विमानतळाला-दी बा पाटील यांचे नामंतराचे विषय कॅबिनेटमध्ये पुन्हा मंजूर करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून पुन्हा घेण्यात आला. यामुळं शिंदे सरकारचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बैठकीत शिंदे म्हणाले, लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असंही ते म्हणाले.