ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे गटाला आणखी एक धक्का! मराठा आरक्षणावरून २ खासदारांनंतर आता आमदाराचा राजीनामा

मुंबई : (Shinde group’s resignation from MLA) राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिंदे गटाचे वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे, अनेक भागात आंदोलक आक्रमक झाले आहेत. इतर काही पक्षातील नेत्यांसह शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार रमेश बोरणारे यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षकडे दिला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मागणीसाठी उपोषण व आंदोलन करीत आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मिळू शकले नाही. म्हणून मराठा समाजाच्या या संबंधी अंत्यत तीव्र भावना असून मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी माझा मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून मी माझ्या विधानसभा सदस्य या पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे, असे बोरणारे यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये