रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील रांगडं आणि रोखठोकपणे केलेलं भाषण चांगलंच गाजलं. मात्र यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती, ब्रेकच लागत नव्हता असं उद्धव ठाकरे म्हणाले. या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे मर्सिडीज कारने प्रवास करतात. त्यांच्या ताफ्यात काही मर्सिडीज कार आहेत. याचाच धागा पकडत, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याबाबत एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात आता शिवसेना नेमकी कोणाची याबाबत अनेक तर्कवितर्क लावले आहेत.