शिवसेना ऍक्शन मोडमध्ये; मिलिंद नार्वेकर ताफा घेऊन थेट गुजरातला रवाना

मुंबई- Maharashtra Politics : शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल रात्री महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कल्टी मारून शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातला रवाना झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंपच आला आहे. या घटनेनंतर सगळ्याच पक्षांमध्ये भेटीगाठी आणि बैठकांना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार पडेल की काय अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

एकनाथ शिंदे काही आमदारांना सुरतला घेऊन गेलेले असल्याने त्यावर शिवसेनेची बैठक झाली. आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर गुजरातमध्ये रवाना झाले आहेत. सुरत मधील ली मारिडिअन हॉटेल मध्ये एकनाथ शिंदे आमदारांसोबत आहेत. त्यांच्या भेटीला मिलिंद नार्वेकर सुरत मधील त्या हॉटेल मध्ये पोहोचले आहेत. यानंतर नार्वेकर काय करतील हे बघण्यासारखे राहणार आहे.

मिलिंद नार्वेकर त्या हॉटेल मध्ये जाताना गुजरातमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अशीही माहिती आहे. संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना ली मारिडिअन हॉटेल बाहेर एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांना सात प्रकारची सिक्युरिटी दिलेली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे नार्वेकर तिथे पोहोचल्यावर त्यांची इतर आमदारांशी भेट होईल की नाही आणि भेट झाली तरी काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Dnyaneshwar: