ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निर्णय लांबणीवरच! धनुष्यबाण कुणाचा गुलदस्त्यात? पुढील सुनावणी 30 तारखेला

नवी दिल्ली : (Shiv Sena Symbol Issue Election Commission) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात गेला आहे. शुक्रवार दि. 20 रोजी पार पडलेली शिवसेना आणि धनुष्यबाणावरील सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी 23 जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही.

आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं.

त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी एक तास दहा मिनिटं युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी देखील युक्तिवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये