Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

शिवसेनेचं महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात लवकर राज्यभर आंदोलन, महाराष्ट्र बंदची हाक!

मुंबई : (Uddhav Thackerey News) “मागील काही दिवसांपासून राज्यातून मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. राज्यपाल अनेकदा राज्यातील आदर्शांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा भाग कर्नाटकात घेण्याचा दावा करतात. हे वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे आता वेळ आलीये या महाराष्ट्र द्रोहींना त्यांची लायकी दाखवायची. यावर पुढील दोन तीन दिवसांत काहीतरी निर्णय व्हायला हवा. आम्ही सर्व पक्षांतील महाराष्ट्र प्रेमींना आवाहन करतो की येत्या दोन तीन दिवसांत महाराष्ट्र बंद ठेवायची वेळ आली तरी चालेल, मात्र रस्त्यावर उतरण्यासाठी एकत्र यावं.” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

“राज्यपाल प्रत्येक राज्यात केंद्रातून पाठवण्यात आलेला असतो. त्यांना सांगण्यात आलेले असणार त्याशिवाय ते असं बोलूच शकत नाहीत. ते कायम आमच्या आदर्शांचा अपमान करत आहेत. आपल्याला राज्य आणि आपले आदर्शे टिकून ठेवायचे असतील तर आपल्याला या लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरावेच लागेल. आमची केंद्र सरकारला विनंती आहे, त्यांनी त्याचं पार्सल स्वतः घेऊन जावं. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना पाठवून देऊ.” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री हे पहेचान कोण? सारखे आहेत. प्रत्येक प्रकरणात उपमुख्यमंत्री बोलतात. मुख्यमंत्र्यांवर उपरावले की कृपा आहे. त्यांना खुर्ची प्यारी आहे. कोणी कितीही अपमान केला तरी, ते कोणाच्याही विरोधात बोलू शकत नाहीत. कारण तयंना त्यांची खुर्ची महत्वाची आहे.” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणांवर शांत असल्याच्या प्रश्नावर दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये