ताज्या बातम्यामनोरंजन

शिव ठाकरेचे चाहत्यांसाठी मोठे सरप्राइज; नव्या गाडीनंतर शिवने सुरू केला नवा बिझनेस

मुंबई | बिग बॉसचा 16 (Bigg Boss 16) वा सिझन चांगलाच हिट ठरला. यात मराठमोळ्या शिव ठाकरेने (Shiv Thakare) सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शिवने शेवट्पर्यंत मजल मारत फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याला आता नवीन शो मध्ये पडद्यावर पुन्हा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नुकतीच शिवने त्याची पहिली गाडी देखील खरेदी केली. त्यानंतर आता शिवने चाहत्यांसाठी एक सरप्राइज आणलं आहे.

शिवने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. ठाकरे: चाय अँड सॅक्स (Thakare Chai and Snacks) नावाचा ब्रँड सुरू केला आहे. बुधवारी शिवने त्याच्या हा ब्रँड लॉन्च केला आहे. ठाकरे: चाय अँड सॅन्क्स नावाने शिव मुंबई, पुणे व अमरावतीत रेस्टॉरंट सुरू करणार आहे. “ठाकरे: चाय अँड सॅन्क्स हा ब्रँड मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याबरोबरच या ब्रँडचे अनेक ठिकाणी रेस्टॉरंट्स मला सुरू करायचे आहेत”, असं शिव म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये