ताज्या बातम्यामनोरंजन

त्या व्हिडिओत आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं; एल्विश यादव प्रकणावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

Elvish Yadav Snake Venam : YouTuber आणि Big Boss OTT विजेता एल्विश यादवच्या (Elvish Yadav) अडचणीत वाढ होताना दिसतेय. एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या (Rave Party) आयोजित करत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेव्ह पार्टीमध्ये तो नशेसाठी सर्पविषाचा वापर करत होता. याप्रकरणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करुन 5 जणांना अटक केली आहे. मात्र एल्विशनं रेव्ह पार्टी आयोजित करणं आणि तिथं सापाचं विष दिल्याचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. या प्रकरणावर आता शिव ठाकरे यानं प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत शिवनं एल्विश यादव प्रकरणावर भाष्य केलंय. एखादा व्यक्ती यशाची उंची गाठत असतो, तेव्हा अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं की या गोष्टी खोट्या असतील. शिव पुढं म्हणाला की, मला हे प्रकरण नेमकं काय आहे, ते सध्या माहिती नाही. मी एल्विशचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं. सध्या काही अफवा पसरत आहेत. जेव्हा तुम्ही यशस्वी होता, ते काही जणांना हे यश खुपत असतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये