ताज्या बातम्यामनोरंजन

शिवच्या ‘त्या’ कृतीची होतेय सगळीकडे चर्चा, नेटकऱ्यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तू खूप…”

मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) मुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) प्रसिद्धीझोतात आला आहे. सोशल मीडियावर नेहमीच तो चर्चेत असतो. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच आता शिव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवच्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शिवचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत शिव डोसा खाताना दिसत आहे. तसंच तो डोसा शिवनं चमच्यानं न खाता हातानं खाल्ला आहे. “चमच्यानं डोसा खाल्ल्याचा फील येत नाही. तर चव ही हातानेच येते”, असं शिव व्हिडीओत म्हणालाय. त्याच्या या कृतीमुळे त्याचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती देखील दर्शवली आहे.

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, “शिव तू खूप पुढे जाशील.” तर दुसऱ्यानं म्हटलंय, “शिव एकदम आमच्यासारखा माणूस आहे.” तर “शिव तुला देव कायम यश देवो”, असंही एकानं म्हटलं आहे. तसंच शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये