ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

ई श्रम कार्डच्या माध्यमातून कोट्यावधीची पेरणी; वडार वाडीमध्ये ५०० हुन अधिक नागरिकांना लाभ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातून उतरलेल्या श्रमिक वर्गातील लोकांना उत्पन्न देणाऱ्या श्रम कार्ड संकल्पनेला आता पुण्याच्या भाजपवासियानी चांगलेच मनावर घेतले दिसत आहे. सिद्धार्थ शिरोळे यांच्या सहयोगातून प्रधानमंत्री प्रचार प्रसार योजनेच्या व्यासपीठावरून डॉ. शैलेश चौबे यांनी शिवाजीनगर भागामध्ये बुधवारी हा उपक्रम कमालीचा यशस्वी करून दाखवला.पाचशेहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. सलग दोन दिवस वडारवाडी आणि गोलंदाज चौक या परिसरात हे कार्यक्रम पार पडले.

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार – प्रसार अभियानाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. शैलेश चौबे यांनी अभियानाचे आयोजन केले होते. या अभियानाचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ शैलेश चौबे व त्यांचे सहकारी संपूर्ण एकजुटीने आणि उत्साहाने हे अभियान पुढे नेण्यासाठी कार्यरत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ही टीम पूर्ण उत्साहात काम करीत आहे. या अभियानात सिद्धार्थ शिरोळे आणि रवींद्र साळेगावकर यांचे सहकार्य मोलाचे होते.

शिवाजीनगर प्रधानमंत्री इ-श्रम कार्ड योजनेला बुधवारी वडारवाडी येथील गोलंदाज चौकात आमदार शिरोळे आणि डॉ. शैलेश चौबे यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांसाठी इ-श्रम कार्ड काढून देण्यात आले यावेळी अभियानाच्या सरचिटणीस श्रीष्टी कुमार, शोभना आपटे, आनंद केशव, सचिन चंदनशिवे, संकेत टिल्लू, भाजपचे पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खोड, शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, मुकारी अण्णा अलगुडे, गणेश बगाडे आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अर्ज करण्यासाठी आलेल्या नागरिकांना डॉ शैलेश चौबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठीच वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. त्याचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यायला हवा. तो मिळवून देण्याचं काम जनकल्याणकारी योजना अभियान आणि भाजपकडून केलं जात आहे.” त्याचबरोबर उपस्थित रवींद्र साळेगावकर यांनी देखील नागरिकांना योजनांचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे.

अभियानाचे जिल्हाध्यक्ष शैलेश चौबे यांनी यावेळी अभियानाची रूपरेषा आणि योजनांचे फायदे सांगितले. मागील तीन महिन्यात ५००० पेक्षा जास्त लोकांना लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात जनकल्याणकारी योजना अभियानाला यश आले आहे. या अभियानासाठी शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपच्या अनेक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत चौबे यांनी त्यांचे आभार मानले. श्रीष्टी कुमार यांनी समस्त नागरिकांना इ श्रम कार्ड तसेच इतर अनेक केंद्रीय योजनांबद्दल माहिती आणि त्यांचे फायदे सांगितले.

स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात या अभियानाचा लाभ घेतला. यावेळी ३०० पेक्षा जास्त नागरिकांनी इ श्रम कार्डसाठी तर २०० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज केले. मागील काही दिवसांपासून या अभियानांतर्गत डॉ. शैलेश चौबे यांच्या पुढाकाराने गोखलेनगरमध्ये ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानांतर्गत योजनांचा लाभ घेतला आहे. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार असून पुढील दिवसांत डेक्कन जिमखाना आणि गणेश खिंड रोड याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये