संभाजी भिडे यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; महिला पत्रकाराला म्हणाले, ‘तू आधी कुंकू लाऊन ये, मगच…”

मुंबई – SAMBHAJI BHIDE CONTROVERCIAL STATEMENT : शिवप्रतीष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यात त्यांचा पुरुषप्रधान दृष्टीकोन कायम दिसतो. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी ‘आंबे खाल्ल्याने मुले होतात असं वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. यावेळी देखील त्यांनी यापेक्षा मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. तेथून बाहेर पडताच साम टीव्हीच्या एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. मात्र, प्रश्न विचारतानाच संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराच्या कपाळाकडे बघून “तू आधी कुंकू लावून ये मग मी तुझ्याशी बोलीन’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘आम्हाला देशातील सर्व स्त्रिया भारत माता दिसतात आणि भारत माता विधवा नाहीये. त्यामुळे तुम्ही कुंकू लावून या’ असं स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी दिलं. त्यांच्या या वक्तव्यानं राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावर नोटीस बजावली जाईल अशी प्रतिक्रिया देत, ‘संभाजी भिडे यांचे असे वागणे बरे नसून यातून त्यांची वृत्ती समजते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
2 Comments