एकनाथ शिंदेंचा दावा खोटा, मिरा भाईंदरमधील 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबतच!

मुंबई : (Shivsena On Eknath Shinde) गुरुवार दि. १४ रोजी शिवसेनेतील बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महानगर पालिकेतील १८ पैकी तब्बल १० नगरसेवक व पदाधिकारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर मिरा-भाईंदर येथिल शिवसेनेला सुरुंग लावण्याचं काम शिंदे गटानं केल्याचं बोललं जात होतं. या सर्व नगरसेकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आहे असं सरनाईकांनी सांगितलं होतं.
दरम्यान, सरनाईक यांचा हा दावा शिवसेनेचे मिरा भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हाञे यांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. मुळातच मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसत होते. त्यामुळं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर त्यांना नियुक्त केले होते.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १० विद्यामान नगरसेवक पदाधिकारी यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र संध्याकाळपर्यंत शिवसेने आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. 19 नागरसेवकांपैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईकांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे शिवसेनेचे मिरा भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हाञे यांनी सांगितलं आहे. काही नगरसेवक गेले असले तरी 18 ते 11 नगरसेवक आजही उध्दव ठाकरेंच्या सोबतच असल्याच सांगितलं आहे.