ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे; पुण्यात शिवसेना आक्रमक, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त!

पुणे : शुक्रवार दि. 23 रोजी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, पोलिसांकडून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर वातावरण पेटलं असून शिवसेनेने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी PFI च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्यामुळे शिवसेनेने या घटनेचा निषेध नोंदवला असून PFIच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी शिवसेनेकडून हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.