ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

वंचितचा २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता फटका! आता भाजपला बसणार?

मुंबई : (Shivsena-Vanchit Bahujan Vikas Aghadi Alliance) मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आज अखेर त्याला मुहुर्त मिळाला आहे. आज 23 जानेवारी रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती-भिमशक्ती येण्याची घोषणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. अन् त्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकारश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली.

दरम्यान, शिवशक्ती- भिमशक्ती एकत्र आली तर याचे राजकीय फायदे-फोटे २०१९ च्या निवडणुकीतून समजतात. त्यावेळी वंचित आघाडी आणि एमआयएमची युती होती. या युतीमुळे निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी २४ लाखं मते मिळाली होती. तर विधानसभा निवडणुकीत वंचितला २८ लाख मते मिळाली. वंचितचे उमेदवार १० जागांवर दुसऱ्या तर २३ ठीकाणी तिसऱ्या स्थानावर होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले. यामुळे २० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव झाला.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर भाजप आणि शिंदे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र वंचितची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती होणार असल्याचे स्पष्ट असले. तरी वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का? यावर अजून कोणीही भूमिका स्पष्ट केली नाही. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती आली नाही. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढवल्या तर भाजपला मत विभाजनामुळे फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये