क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

शोएब अख्तरचं भाकित खरं ठरणार? म्हणाला, विश्वचषकात पाकिस्तान भारताचा पराभव करणार..

Shoaib Akhtar On India vs Pakistan World Cup Match : भारतात होवू घातलेल्या विश्वचषकाला आवघे काही दिवस शिल्लक असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं विधान केलं आहे. त्याच्या या विधानाने भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.

दरम्यान, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याला 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. विश्वचषकातील सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे.

या ब्लॉकबास्टर सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारताचा पराभव करेल, असा विश्वास शोएब अख्तर याने व्यक्त केलाय.

विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताने बाजी मारलेली आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत भारताचा पराभव करता आलेला नाही. मोठ्या सामन्यात दबाव झेलण्याची पाकिस्तानच्या संघाचे मजबूत बाजू असल्याचे शोएबने म्हटलेय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये