धक्कादायक ! ६० मुलींचा अंघोळ MMS व्हायरल होताच विद्यापीठात उडाला गोंधळ, पहा नक्की काय घडलं?

चंडीगड – Chandigarh University Girls Hostel Incident : पंजाबमधील चंडीगड युनिव्हर्सिटीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होस्टेल मधल्या एका मुलीने ६० मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून शेअर केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. संतप्त विद्यार्थिनींनी विद्यापीठाला घेराव घालत आंदोलन केलं आहे. त्यातील ८ मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची देखील माहिती आहे. मात्र, कोणत्याही मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. व्हिडीओ काढणाऱ्या मुलीने मी फक्त स्वतःचा व्हिडीओ काढला असल्याचं म्हटलं आहे.
नक्की काय घडलं?
“चंदीगड युनिवर्सिटीत होस्टेलवर राहणाऱ्या जवळजवळ ६० मुलींचा त्यांच्यातीलच एका मैत्रिणीने अंघोळ करताना व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ तिने शिमला मध्ये राहणाऱ्या तिच्या एका मित्राला पाठवला. तेथून तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीया वर व्हायरल झाला. ही बाब समजताच सर्वत्र गोंधळ उडाला. त्यातील ८ तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा प्रकारचा व्हिडीओ मागील अनेक दिवसांपासून बनवण्यात येत होता, मात्र काल रात्री होस्टेलच्या वार्डनने माहिती मिळताच तिला ताब्यात घेतले.” अशी माहिती समोर आली आहे.
मात्र, व्हिडीओ काढणाऱ्या तरुणीने मी फक्त स्वतःचाच व्हिडीओ काढून पाठवला असल्याचं सांगितल आहे. तिने इतर कोणत्याही मुलीचा व्हिडीओ काढला नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. तरुणींना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळणार असं आश्वासन दिलं आहे. होस्टेल मधल्या कोणत्याही मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं मोलीसांनी सांगितल आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका अशी पोलिसांनी सांगितलं आहे.