सोसायटीतील दुकानदाराने दहा वर्षांच्या मुलीसोबत केले अश्लील कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे | पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही (Pune Crime News). त्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिकच वाढत आहे. आजूबाजूच्या परिसरात अशा धक्कादायक घटना घडत असताना सिंहगड रस्त्यावर अशाच प्रकारची भयानक घटना घडली आहे. सोसायटीतील दुकानदाराने दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केले आहे. याप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी महिपती कोंडेकर (वय 55) असे गुन्हा दाखल केलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंडेकर याचे दुकान सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत आहे. या सोसायटीत कोंडेकरचे दुकान आहे. तक्रारादार महिला सोसायटीत राहायला आहे.
सोसायटीतील गच्चीची चावी घेण्यासाठी कोंडेकर महिलेच्या घरी आला होता. महिला आणि तिची दहा वर्षांची मुलगी घरात होती. महिला चावी आणण्यासाठी गेली. तेवढ्यात कोंडेकरने मुलीशी अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.