ताज्या बातम्यामनोरंजन

श्रद्धा वालकर हत्याकांडावर लवकरच येणार चित्रपट, नावाचीही झाली घोषणा!

मुंबई | Shraddha Walker Murder Case – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं (Shraddha Walkar Case) देशात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावालानं तिची हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून आफताबनं ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तसंच ठराविक दिवसांनी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगल्यामध्ये फेकायचा. तब्बल सहा महिन्यांनंतर हे दृष्कृत्य आता उघडकीस आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून या प्रकरणावर तपास सुरू आहे.

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. तसंच या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या प्रकरणावर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण व्यक्त होत आहे. यादरम्यान, आता श्रद्धा वालकर हत्याकांडावर लवकरच चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंह (Manish F Singh) हे या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. तसंच या चित्रपटाच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘हू किल्ड श्रद्धा वालकर'(Who Killed Shraddha Walker) असं या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण दाखवण्यात येणार आहे. तसंच या चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर काम सुरू असल्याचंही म्हटलं जात आहे.

मनीष एफ सिंह यांनी सांगितलं की, या चित्रपटाचं कथानक लव्ह जिहादच्या संकल्पनेवर आधारीत असेल. वृदांवन फिल्म्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, या चित्रपटात कोण-कोणते कलाकार काम करणार आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये