मोठी बातमी! जंगलात मिळालेले हाडांचे सॅंपल श्रद्धाच्या बाबांच्या DNAशी जुळले

नवी दिल्ली : Shraddha Walker Murder Case : (Shraddha Walker’s Bone samples matched the DNA of Shraddha’s father) महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर (Shraddha Walker Murder Case) हिच्या हत्येसंबंधित मोठी बातमी समोर आलेली आहे. गुन्हेगार आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे दिल्ली परिसरात अनेक ठिकाणी फेकून दिल्याची माहिती होती. दरम्यान, पोलिसांनी दिल्ली परिसरातील जंगलातून हाडांचे काही सॅंपल जमा केले होते. आणि आता ते सॅंपल श्रद्धाच्या वडीलांच्या DNAशी जुळले असल्याची माहिती आहे. यामुळे पोलिसांना अधिक तपासासाठी अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. (Shraddha Walker’s Bone samples matched the DNA of Shraddha’s father)
दरम्यान, गुन्हेगार आफताबने काही दिवसांपूर्वी पोलिसांना चॅलेंज दिले होते श्राद्धाच्या मृतदेहाचे कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती लागू शकत नसल्याचं त्यानं म्हटलं होतं. पोलिसांनी ते शोधून धाकावावेल असे चॅलेंज त्याने केले होते.
श्राद्धाच्या हाडांचे सॅंपल दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून गोळा केले होते. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.