स्लीम दिसणाऱ्या श्रेयस अय्यरने रचला ‘हा’ विक्रम; दिग्गजांना जमले नाही ते करुन दाखले
Shreyas Iyer News Record : वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या. यात शुभमन गिलने 92 विराट कोहलीने 88 तर श्रेयस अय्यरने 82 धावांची दमदार खेळी केली.
श्रेयस अय्यरने 146.43 च्या स्ट्राईक रेटने 56 चेंडूत 82 धावा केल्या. त्यात 6 षटकार आणि 3 चौकार मारले. विशेष म्हणजे या सहा षटकारांमध्ये एक विक्रमी षटकार देखील ठरला. मात्र हा विक्रम श्रेयस अय्यर सारखा स्लीम खेळाडू करेल असे कोणालाही वाटले नाही.
श्रेयस अय्यरने यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार मारत विक्रम केला. श्रेयस अय्यरने कुसल रजिथाच्या गोलंदाजीवर 106 मीटर लांब षटकार मारला. त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या 104 मीटर षटकाराचा विक्रम देखील मोडला. यापूर्वी अय्यरने 101 मीटर लांब षटकार मारला होता. त्याने आपलाच विक्रम मोडला.
https://www.instagram.com/reel/CzJF579PChD/?utm_source=ig_web_copy_link