ताज्या बातम्यामनोरंजन

लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल! श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत पत्नी दिप्तीची भावनिक पोस्ट

Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. या बातमीनंतर अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. नुकतीच त्याच्या तब्येतीबाबत अपडेट समोर आली आहे. या अपडेटनंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. श्रेयसच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

काय आहे दिप्ती तळपदेची सोशल मीडिया पोस्ट?

दिप्तीने एक पोस्ट शेअर करत श्रेयसच्या तब्येतीसाठी अनेकांनी चिंता व्यक्त करत प्रार्थना केली होती. त्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. तिने सध्या श्रेयसची तब्येत स्थिर असून त्याला काही दिवसांत डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती दिली आहे. श्रेयसला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील मेडिकल टीमने त्याला वेळेत दिलेली ट्रिटमेंट आणि उत्तमरित्या घेतलेली काळजी महत्वाची ठरली असल्याचं म्हणत तिने रुग्णालयातील संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

त्याशिवाय दिप्तीने पोस्टमध्ये श्रेयस रिकव्हर होत असून त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे. सर्व चाहत्यांनी दिलेला पाठिंबा आम्हा दोघांसाठी प्रचंड महत्त्वाचा तसंच अशा काळात ताकद देणारा ठरत असल्याचंही तिने लिहिलं आहे. सोशल मीडियावरील दिप्ती तळपदेच्या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला लवकर बरा होईल अशा कमेंट केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये