सिल्लोडच्या सभेची शिंदे गटाला धास्ती, आदित्य ठाकरेंना सभास्थळ बदलण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव?

औरंगाबाद : (Shrikant Shinde On Aaditya Thackeray) युवासेना प्रमुख यांच्या सिल्लोडमधील सभेची शिंदे गटाने खूपच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, आदित्य ठाकरेंनी सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी आपला सिल्लोडचा दौरा जाहिर केला, अन् दुसऱ्याच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये त्याच तारखेला त्याच दिवशी त्याच वेळी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा जाहिर केला.
मात्र, ज्यांनी पहिल्यांदा परवानगी मागितली त्यांना सभास्थळ मिळणे आवश्यक असताना, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील जिल्हा परिषद मैदानाची परवानगी शिंदे गटाकडून मागितली गेली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील चौकात सभा होणार असून, त्यासाठी ठाकरे गटाकडून पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पण पोलिसांनी दोघांना अजूनही परवानगी दिली नाही. मात्र आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलून पर्यायी जागा देण्याबाबत पोलिसांनी सुचवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.