ताज्या बातम्यामनोरंजन

‘माझ्या सासूचं लग्न!’ सिद्धार्थच्या आईचं दुसरं लग्न; मितालीची सासूसाठी खास पोस्ट; म्हणाली…

Siddharth Chandekar Mother Second Marriage : मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली आणि तितकीच लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. दोघांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रेमात टाकते. मात्र सध्या सिद्धार्थ त्याच्या आईमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या आहेत.

सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांनी स्वतः पुढाकार घेत आईच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली दोघांचे कौतुक होत आहे. सिद्धार्थने याबाबत पोस्ट करत चाहत्यांना गूडन्यूज दिली होती. आता त्यातच सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकर हिने देखील तिच्या लाडक्या सासूबाईसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

सासूबाईच्या लग्नातील काही खास क्षणाचे फोटो मितालीने शेयर केले आहे. या पोस्टमध्ये मिताली लिहिते की,

‘Happy married life सासूबाई!

माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?

खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.

आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.’

https://www.instagram.com/p/CwReqB0qEbk/?utm_source=ig_web_copy_link

मिताली आणि सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत दोघांच कौतुक केले आणि सीमा चांदेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये