ताज्या बातम्यामनोरंजन

घटस्फोटाबाबत अखेर सिद्धार्थ जाधवने केला मोठा खुलासा; म्हणाला…

मुंबई | Siddharth Jadhav Speak About His Divorce – सध्या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधवने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यानंतर ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. तृप्तीने सोशल मीडियावर अक्कलवार हे तिचं माहेरचं आडनाव लावलं आहे. त्यामुळे लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र नुकतंच सिद्धार्थने एका वेबसाईटसोबत बोलताना या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. तसंच नुकतंच सिद्धार्थने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावर तो म्हणाला, “या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत, हेच मला कळत नाहीत. आम्ही एकत्र आहोत. आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे.” असं सिद्धार्थनं म्हटलं आहे.

यावेळी सिद्धार्थला कौटुंबिक मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही वेगळे राहत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने “सब कुछ ठीक है” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे सिद्धार्थने या विषयावर बोलण्यास नकार दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये