मुसेवाला हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी त्यांच्या मारेकारांचा तपास दिल्ली, पंजाब, हरियाना, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या पोलिसांकडून सुरु झाला. त्यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातील दोन तरुणांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. अशातच, सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा मोकाट फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आरोपी अंकित, सचिन, प्रियव्रत, कपिल आणि दीपक मुंडी हे कारमध्ये मोकाट फिरत असून, गाणी वाजवत हसत असल्याचं व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. सुद्धू यांची हत्या केल्यानंतरचा हा व्हिडीओ असून सुद्धू यांच्या हत्येनंतर आनंद साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांपैकी सचिन, प्रियव्रत, अंकित आणि कपिल यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांच्यापैकी दीपक फरार असल्याची माहिती आहे. अंकित १९ वर्षाचा असून दोन दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सिद्धू मुसेवाला यांची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केली असल्याची माहिती आहे. वरील आरोपी देखील त्याच टोळीकडून पाठवण्यात आल्याच आरोपींनी सांगितलं आहे. अंकितच्या मोबाईल मध्ये पोलिसांना व्हिडीओ मिळाला असून तो इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आल होता. पोलिसांनी आता तेथून व्हिडीओ हटवला आहे.