‘महाराष्ट्र केसरी’ हरला, पण ‘विसापूर केसरी’चं मैदान मारलं! सिकंदरची जबरदस्त कामगिरी
सातारा : (Sikander Sheikh Win Visapur keshari) पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालावर राजकीय वास येत असल्याची सर्व सामान्यांमध्ये कुजबूज आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण सोशल मिडियावर व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला जादा गुण दिल्याचा आरोप सध्या होत आहेत. यावेळी पंचांना धमकावण्याचा प्रकार देखील घडला होता.
दरम्यान ‘महाराष्ट्र केसरी’ दावेदार मानल्या जाणाऱ्या सिकंदर शेखने सांगलीतील विसापूर केसरीचं मैदान मारले आहे. सिकंदर शेखने विसापूर केसरीच्या मैदानात आपला दम दाखवला आहे. पंजाबच्या पैलवानाला सिकंदर शेखने पाच मिनिटात धुळ चारली. महाराष्ट्र केसरी नंतर सिकंदर थेट सांगली जिल्ह्याच्या स्पर्धेत उतरला. या ठिकाणी त्याने सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला लोळवले. या स्पर्धेत देशभरातून मल्ल आले आले होते. त्यामुळे या स्पर्धेत कुस्तीप्रेमिंनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत अनेक अनुभवी मल्लांना सिकंदर शेखने धुळ चारली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेपासून तो चांगलाच चर्चेत आला. तो सैन्य दलाकडून खेळतो. पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सिकंदर शेख याच्यासह सोशल मीडियावरून होत आहेत.