दुर्दैवी! पुण्यातील चार मुलींचा सिंधुदुर्ग समुद्रात मृत्यू, एकजण बेपत्ता
सिंधुदुर्ग | पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना देवगड समुद्र किनाऱ्यावर घडली आहे. यामधील चौघांचे मृतदेह मिळाले, तर एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता असल्याचे समजते. शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्यानंतर आंघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील ५ जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यात चार मुली आणि एक मुलगा होता. चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले.