ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिका पदुकोणचा खतरनाक लूक समोर; रोहित शेट्टी म्हणाला,”सर्वात क्रूर ऑफिसर…”

Singham Again Deepika Padukone New Look : ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या सिनेमाची काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) थतरनाक लूक आऊट झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) आगामी सिनेमांमध्ये ‘सिंघम अगेन’ या सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमात अजय देवगन दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आता या सिनेमातील दीपिकाचा खतरनाक लूक समोर आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिका पदुकोणचा लूक आऊट करण्यात आला आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका खूपच खतरनाक दिसत आहे. रोहित शेट्टीने अभिनेत्रीचे वेगवेगळ्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा लूक शेअर करत रोहित शेट्टीने लिहिलं आहे,”नारी सीता का भी रूप है और दुर्गा का भी…यए हमारी शक्ती शेट्टी…मेरी लेडी सिंघम..दीपिका पदुकोण”. रोहित शेट्टीने शक्ती शेट्टीला सर्वात क्रूर ऑफिसर म्हणटले आहे. दीपिकाने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,”शक्ती शेट्टीची ओळख करून देत आहे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये