IPL च्या तोंडावर चेन्नईला मोठा धक्का, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर
मुंबई | IPL 2023 – लवकरच आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होणार आहे. येत्या 31 मार्चला आयपीएल 2023 या मोठ्या टुर्नामेंटचा नारळ फुटणार आहे. मात्र, आयपीएलच्या तोंडावरच चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायली जेमिसन (Kyle Jamieson) आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कायली जेमिनसच्या पाठीच्या दुखापतीमुळं तो बाहेर पडला आहे. त्यामुळं कायलीच्या जागेवर आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मेगाला (Sisanda Magala) खेळणार असल्याचं सीएसकेनं जाहीर केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी सिसांडा मेगालानं 4 टी 20 सामने खेळले आहेत. 136 विकेट्सची नोंद त्याच्या नावावर आहे. मेगालानं सनरायजर्स इस्टर्न केप संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. तसंच त्याचं यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण होत आहे. सीएसकेनं 50 लाखांच्या बोलीवर त्याचा संघात समावेश केला आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात कायल जेमिसनला सीएसकेनं १ कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केलं होतं. मात्र, आता जेमिसनच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मेगाला खेळणार असल्याचं सीएसकेनं त्यांच्या ट्विटर हॅंडलवर जाहीर केलं आहे.