आरोग्यताज्या बातम्यापुणे

पुण्यात ‘झिका’चा धोका वाढला; पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन

पुणे | शहरात झिका (Zika Virus) विषाणूचा रुग्ण आढळलेल्या परिसरात आणखी सहा संशयित रुग्ण (Zika Virus Test Positive) सापडले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना आता ताप, सर्दी, खोकल्यावर दुर्लक्ष करुन चालणार नाही आहे.

झिका व्हायरस पॉसिटीव्ह झालेली महिला नुकतीच पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) एका सांस्कृतिक कार्यक्रमात गेली होती. त्यावेळी ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. यानंतर महिलेला ताप आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवली. त्यामुळे महिलेला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरच्या चाचण्यांनी झिका विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

खबरदारी म्हणून, पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना झिका रुग्ण आढळलेल्या भागात योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश जारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभाग सक्रियपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये