Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

“कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही”

मुंबई – Sharad pawar on Bhagat Singh Koshyari | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नवीन राज्यकर्ते राज्याचा कारभार पाहणार आहेत. शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे आणि फडणवीस यांना पेढा भरवला होता. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला आहे.

पक्षाचा व्हिप पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना होय. मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला. महाराष्ट्र राज्या कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान,  महाराष्ट्रात आणि देशाबाहेरच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. या सगळीकडे काम करत असताना त्या कामाचे मी दोन भाग करतो. खेळाच्या संबंधीच्या बाबींपासून दूर जातो,कारण तो माझ्या कामाचा भाग नाही.बीसीसीआय अध्यक्ष असतानाही मी निवड समितीचे काम कधीही केले नाही. माझ्यासारख्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी यात पडता कामा नये.शासकीय क्षेत्राकडे काम करताना प्रश्न मांडण्यासाठी,संघटनांना फायदा मिळण्यासाठी मी काम केल्याचं पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये